कलाकारांसह म्हाडा कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना लवकरच म्हाडाची लॉटरी लागणार आहे. रत्नागिरी येथे झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय झाला असून रत्नागिरी जिल्ह्यासाठी तब्बल 400 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पोलिसांच्या घराचा प्रश्न देखील मार्गी लागला असून त्यांच्या वसाहतीसाठी 155 कोटींची तरतूद करून त्याची शिफारस शासनाकडे केल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महत्त्वाचे निर्णय
चिपळूण आणि दापोली येथील घर बांधणीसाठी 95 कोटींना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून कोकण नगर येथे बॅडमिंटन हॉल, सभागृह, रस्ते आणि गटार बांधणीला 11 कोटी मंजूर करण्यात आले.
