झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा विनयभंग

दुचाकीवरून घरी निघालेल्या महिलांवर अश्लील शेरेबाजी करून विनयभंग करणाऱ्या दोन झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड सिग्नल परिसरात सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी तिथे असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्यांना रोखले. तसेच बिट मार्शलनी कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. छोटेलाल सोनी (३५), गजानन शिंदे (२९) अशी आरोपींची नावे आहेत.

राबोडी परिसरात राहणाऱ्या दोन मैत्रिणी वेदांत रुग्णालयात गेल्या होत्या. तेथून घरी परत येत असताना घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड सिग्नलजवळ दोन झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयनी त्यांना शिवीगाळ केली. त्याचा जाब या महिलांनी विचारल्यानंतर त्यांनी मोटरसायकल थांबवून या महिलांना गाडी चालवता येत नाही का, असा प्रश्न केला. तसेच त्यापैकी मागे बसलेल्या व्यक्तीने या महिलेचा विनयभंग केला, मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित वाहतूक पोलिसांनी त्याला रोखले. कापूरबावडी पोलिस ठाण्याचे बिट मार्शल घटनास्थळी येऊन या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *