देवदर्शनावरून परतताना भीषण अपघात, सोलापूरचे पाच जण ठार

देवदर्शनावरून परतताना सोलापूरातील पाच जणांचा अपघातील मृत्यू झाला आहे. गुलबर्गाजवळील असलेल्या आळंद येथे मंगळवारी पहाटे अपघात झाला. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूरच्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रावण सोमवारनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर गावातील एक कुटुंबीय देवदर्शनासाठी दक्षिण भारतात गेले होते. देवदर्शन आटोपून घराकडे परत येत असताना गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येथे काळाने घाला घातला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमींना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल केले. या भीषण अपघाताची माहिती मिळताच चिंचपूर गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *