शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांच्या गाडीला अपघात झाला. नाशिककडे जात असताना तोरंगण घाटात त्यांची कार खोल दरीत कोसळली. यावेळी रोहतसोबत गाडीत डॉ. संजय शिंदे (४५ वर्ष) हेदेखील होते. या अपघातात संजय शिंदे यांचा मृत्यू झाला तर राजेंद्र आणि डॉ. जतीन संखे गंभीर जखमी झाले. जखमींवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गाडीचा टायर फुटल्यानंतर ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय. गाडी पुलाचा कठडा तोडून नाल्यात जाऊन कोसळली. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मोटारीतून बाहेर काढलं. परंतु, रुग्णवाहिका रुग्णालयात पोहचेपर्यंत संजय शिंदे यांचा मृत्यू झाला होता.
