भिवंडी येथील शांतीनगर परिसरातील एक चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तर दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत अजून आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगर भागात पिरानीपाडा येथील सिटी लाईट्स हॉटेलच्या मागे, मतलो सरदार ऑफीस जवळ असलेली इमारात रात्री उशिरा अडीच वाजताच्या सुमारास कोसळली. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्नीशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत चार जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. तर दोघांचा मृत्यू झाला असून काही जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याआधी मुंबईतील डोंगरी भागात असलेली केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील 14 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेदरम्यान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठ्या समस्येचा सामना करावा लागला होता. यावेळी 23 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.
