बायको उलटे बोलते म्हणून पतीने केला खून

बायको उलट बोलते , शिवीगाळ करते , या कारणावरून झालेल्या भांडणात रागाच्याभरात पत्नीला जबर मारहाण करून लोखंडी धारदार हत्याराने खून करून फरार झालेल्या पतीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून अटककेली आहे , दरम्यान आरोपीला जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यास  दि २६ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
भगवान नारायण रोडे (वय ६९) रा. तालखेड. ता. माजलगाव. जि. बीड. यास अटक करण्यात आली आहे , त्याने १९ आॅगस्ट रोजी पत्नी मंदाबाई भगवान रोडे (वय – ५०) यांचा खून केल्याप्रकरणी  भा.द.वि. कलम ३०२ दाखल करण्यात आला होता , खुनाची फिर्याद श्रीपाद मोहन ठुसे रा. ना गाव यांनी दिली होती .
पत्नी मंदाबाई भगवान रोडे यांचा खून करून पळून गेलेला भगवान रोडे याचे पुर्ण नाव व पत्ता माहिती नसल्याने त्याचा शोध घेणे किचकट होते . मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक दीपक साबळे ,पोलीस हवालदार शंकर जम, सुनील जावळे, शरद बांबळे, राजू मोमीन व नारायणगावचे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश बाप्पू साबळे यांनी भगवान रोडे हा नारायणगावला कोणाकडे व कशासाठी आला होता याचा तपास सुरू केला होता , तपासात एका सीसी टीव्ही मध्ये रोडे याचा चेहरा मिळून आला . पोलीस पथकाने मिळालेल्या फोटोच्या आधारे जुन्नर व आंबेगाव तालुक्यात तपास सुरू केला , हे पथक पेट्रोलिंग करीत असताना एका खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार फोटो प्रमाणे मिळता जुळता एक इसम हा पारगाव शिगवे परीसरात फिरताना दिसुन आल्याचे समजल्याने पथकाने त्याला सापळा रचून निरगुडसर बस स्टॅन्ड परिसरातुन ताब्यात घेऊन त्यास नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव भगवान नारायण रोडे (वय ६९) रा. तालखेड. ता. माजलगाव. जि. बीड. असे सांगितले व पत्नीच्या खुनाची कबुली दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *