भारताने जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस थांबविल्यानंतर आता थार एक्सप्रेस सेवाही रद्द केली आहे. तसेच दिल्ली-लाहोर बस सेवाही बंद करण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे.
दरम्यान, मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. कोणीही जिंकू शकणार नाहीत, अशा युद्धाकडे दोन्ही देश जात आहेत, असं इम्रान खान यांनी म्हटलं होतं. तर आमचं सैन्य कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असल्याचं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी म्हटलं होतं. त्यामुळे भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत ठणकावलं होतं. पाकिस्तानकडून एलओसीवर ज्या हालचाली सुरू आहेत, त्याचे परिणाम वाईट होतील आणि ते पाकिस्तानला परवडणारे नसतील, असं भारतीय सैन्याने म्हटलं होतं.
