दुरुस्तीच्या कामानिमित्त रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री १२.५० ते रविवारी पहाटे ४.५० पर्यंत मेगाब्लॉक असेल.
त्यामुळे रविवारी दिवसभर या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहील. तर मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
याशिवाय हार्बर लाईनवरील कुर्ला ते मानखुर्ददरम्यान अप-डाऊन मार्गावर ११.०० ते ३.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या वेळेत मध्य रेल्वेवरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गाने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.