पवार मराठवाड्याच्या दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलीय. लातूरपासून पवारांच्या या दौ-याला सुरुवात होणार असल्याचं तटकरेंनी म्हटलंय.
तसंच काँग्रेसची तयारी असल्यास कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेससह एकत्र निवडणूक लढवण्याबाबत विचार करु, असंही तटकरेंनी सांगितलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या १५ऑगस्टपासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.

