विजेचा धक्क्याने बैल ठार

पन्हाळा येथील सातवे पैकी आमतेवाडी येथे विजेचा धक्का बसल्याने बैलाचा मृत्यू झाला. आमतेवाडी येथील शेतकरी दत्तात्रेय बापू पाटील यांच्या मालकीचा तो बैल असून अचानक झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला. आज बेंदराच्या दिवशीच बैलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाटील यांनी बैलाला सकाळच्या वेळी चरण्यासाठी सोडले होते. त्यावेळी विजेच्या खांबाच्या तारेतून उतरलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसला. तसेच सोबतच्या आणखी एका कुत्र्याचाही मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *