अभिजीत आणि वैशालीला नेहा ग्रुपमध्ये नको

बिग बॉसच्या घरात पहिल्या पर्वातील पुष्कर, सई, शर्मिष्ठा आणि स्मिता हे सदस्य घरामध्ये पाहुणे म्हणून आले आहेत. स्पर्धक सदस्यांना ‘अतिथी देवो भव:’ हा टास्क देण्यात आलाय. ज्यामध्ये बंद पडलेलं BB हॉटेल पुन्हा सुरु केलं असून पुष्कर, सई, शर्मिष्ठा आणि स्मिता चौघे मिळून सदस्यांना काही मजेशीर टास्क देत आहेत. यातून स्पर्धकांना स्टार कमवायचेत.

बिग बॉसच्या घरी आलेल्या या चार पाहुण्यांनी स्पर्धकांना सळो की पळो करून सोडलं आहे. पुष्करनं साखर, चहा पावडर आणि मिठाची बरणी लपवली त्यामुळं हॉटेल चालवणाऱ्या सदस्यांची चांगलीच गोची झाली. इतकं सगळं कमी म्हणून स्पर्धकांची परिक्षा घेण्यासाठी शर्मिष्ठानं तिला देण्यात आलेल्या सुपमध्ये मुद्दाम केसाचा तुकडा टाकला. यामुळं नक्की कोणाच्या चुकीमुळं सुपमध्ये केस पडला यावरून भांडण सुरु झालं. याची शिक्षा म्हणून सईनं नेहासमोर दोन पर्याय ठेवले. एक म्हणजे मिळालेले चार स्टार परत करायचे आणि दुसरा म्हणजे कोणत्याही चार सदस्यांनी अडगळीच्या खोलीत जायचं.

सईनं दिलेल्या या पर्यावर नेहानं चार स्टार परत करण्याचा परस्पर निर्णय घेतला. नेहानं घेतलेल्या निर्णयाबद्दलअभिजीतनं वैशालीला विचारलं असता आपल्याला काही माहित नसल्याचं तिनं सांगितलं. नेहानं न विचारता निर्णय घेतल्यामुळं अभिजीतला राग आला आणि त्यानं वैशालीसमोर राग व्यक्त केला.

नेहाला परस्पर निर्णय घ्यायचे असतील तर तिनं तिच्या वेगळ्या ग्रुमध्येच खेळावं. तिच्या या निर्णयामुळं आपल्याला तोटा होऊ शकतो. तिच्या चुकीमुळं आपल्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार येईल. त्यापेक्षा तिला माधव आणि हिना यांच्या ग्रुपमध्येच खेळायला सांगू असं अभिजीतचं म्हणणं होतं. वैशालीला अभिजीतचं म्हणणं पटलं. त्यामुळं आता नेहाच्या एका निर्णयामुळं आणखी काय-काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *