नायर‌मध्ये पार्किंग शेड कोसळली

नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील विद्यार्थी डॉक्टरांच्या वसतिगृहातील दुचाकी पार्क करण्याची शेड सोमवारी रात्री जोरदार पावसामुळे कोसळली. त्यामुळे पंचवीस ते तीस गाड्यांचे नुकसान झाले. रुग्णालय प्रशासन आणि पालिकेला वारंवार कल्पना देऊनही या शेडचे बांधकाम वा दुरुस्ती का केली नाही, असा प्रश्न विद्यार्थी डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. आज सकाळी झालेल्या या दुर्घटनेमध्ये विद्यार्थ्यांनी या शेडच्या खाली लावलेल्या गाड्यांचे नुकसान कोण भरून देणार, अशीही चिंता या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सतावत आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये गाड्यांसाठी उभारण्यात आलेल्या या शेडचा एक कोपरा ढासळला होता. ही शेड अंगावर पडल्यास दुर्घटना होऊ शकते, अशीही मागणी करण्यात आली होती. हाजी अली येथे असलेल्या नायर रुग्णालयाच्या या वसतिगृहामध्ये दोनशे विद्यार्थी राहतात. यासंदर्भात रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *