मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, कमी लोकल धावणार

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये आज बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर कमी लोकल धावणार असून आजचे वेळापत्रक रविवारच्या वेळापत्रकानुसार असणार आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल सेवा पुरती विस्कळीत झाली होती. आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे मध्य रेल्वेने आपल्या वेळापत्रकात बदल केलाय. काही लाब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत तर काही लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *