आयएनएस विराट भंगारात काढणार

आयएनएस विराट हे विमानवाहू जहाज भंगार म्हणून विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या हे जहाज नौदलाच्या सेवेत नाही. या निर्णयामुळे लष्कराचा इतिहास आणि वारसा जतन करण्याच्या सरकारच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे.
आयएनएस विक्रांतच्या वाटेने विराटला जाऊ देऊ नये, अशी मागणी यापूर्वीपासूनच होत होती; परंतु संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात आयएनएस विराट विकत घेण्याचे अनेक प्रस्ताव आले आहेत, अशी माहिती दिली. विराट कोणत्याही राज्य सरकारकडे देण्यात येणार नाही. सुरक्षेचा मुद्दा विचारात घेता नौदलाशी झालेल्या चर्चेनंतर विराट भंगारात काढण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला, असी माहिती नाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *