पावसाचा तडाखा, मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद

मंगळवारी मुसळधार पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले. तर मुंबईकरांना या पावसाचा जोरदार तडाखा बसला. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विमानतळाची मुख्य धावपट्टी गुरुवारपर्यंत बंद राहणार आहे.

मुंबईतील विमानतळावर स्पाईसजेट कंपनीचे जयपूर ते मुंबई विमान सोमवारी रात्री धावपट्टीवरून घसरले. यामुळे मंगळवारी रात्रीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ५२ उड्डाणे रद्द करण्यात आली, ५५ विमानांचे मार्ग बदलले तर १०० हून अधिक विमानांच्या वेळात बदल करण्यात आला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विमानतळाची मुख्य धावपट्टी गुरुवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *