दुबईची राणी हया यांनी मुलांसह देश सोडला!

यूएईचे पंतप्रधान आणि दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांची सहावी पत्नी हया बिंत अल हुसेन ३.१ कोटी पौंड इतकी रक्कम घेऊन देश सोडून गेल्याचे वृत्त आहे. दोन्ही मुलांना सोबत घेऊन हया यांनी देश सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

जर्मन दुतावासाने हया बिंत यांना देशाबाहेर पडण्यासाठी मदत केली. सध्या त्या लंडनमध्ये वास्तव्याला आहेत, असे वृत्त असून त्यावरून जर्मनी आणि यूएई या दोन देशांत तणाव वाढण्याची शक्यता आहे. हया जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांची सावत्र बहिण आहे. हया यांनी आधीच आश्रयासाठी जर्मनीकडे विनंती केली आहे.

दुबईचे राजे शेख मोहम्मद यांच्याकडे हया यांनी तलाक मागितला आहे मात्र अद्याप दोघांचा तलाक झालेला नाही. ऑक्स्फर्डमध्ये शिकलेल्या हया २० मेपासूनच सोशल मीडियापासून दूर आहेत. त्यांनी सार्वजनिक उपक्रमांनाही तूर्त विराम दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *