पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वाबळे हे अध्यक्षपदी निवडून आले आहेत. तर विश्वस्तपदी वैजयंती कुलकर्णी-आपटे आणि कार्यवाहपदी विष्णू सोनावणे निवडून आले आहेत.

 शुक्रवार दिनांक २८ जून रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक पार पडली. यावेळी अध्यक्षपदी नरेंद्र  वाबळे हे निवडून आले असून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार संदीप चव्हाण यांचा पराभव केला. वाबळे यांना २०६ तर चव्हाण यांना १६५ मते मिळाली. विश्वस्तपदाच्या एका जागेवर वैजयंती कुलकर्णी-आपटे या निवडून आल्या आहेत. कार्यवाहपदी दैनिक ‘सकाळ’चे उपसंपादक विष्णू सोनावणे, उपाध्यक्षपदी दैनिक ‘आपलं महानगर’चे कार्यकारी संपादक संजय परब आणि सुधाकर काश्यप निवडून आले असून कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड निवडून आले आहेत. कार्यकारिणी सदस्यपदी प्रवीण काजरोळकर, शैलेंद्र शिर्के, स्वाती घोसाळकर, श्यामसुंदर सोन्नर, भीमराव गवळी, कल्पना राणे, देवेंद्र भोगले, सारंग दर्शने आणि इंद्रायणी नार्वेकर निवडून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *