लेबर कॉन्ट्रॅक्टरचा कुटुंबासह विष पिऊन सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न

पुण्यातील लेबर कॉन्ट्रॅक्टरने आपल्या कुटुंबासह विष पिऊन सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या दुर्देवी घटनेत लेबर कॉन्ट्रॅक्टर विनोद रमाकांत जोशी आणि पत्नी मीना जोशी यांचा मृत्यु झाला आहे. तर मुलगा श्रेयश (वय 17) हा यातून बचावला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. कोल्हापुरातील कोंडाओळ इथल्या पल्लवी लॉज मधील घटना घडली. मध्यरात्री आत्महत्येचा हा प्रकार उघडकीस आला.

लेबर कॉन्ट्रॅक्टर विनोद जोशी हे मागच्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्यात ते पुरते अडकले होते. यातून काही मार्गही सापडत नव्हता. त्यामुळे व्यवसायातील तोट्यामुळं आत्महत्या केल्याचं समोर आले आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीमध्ये व्यवसायातील तोट्यामुळं आम्ही आत्महत्या करत आहोत. यामध्ये कोणाचाही दोष नसल्याचा उल्लेख विनोद यांनी केला आहे. आत्महत्येची बातमी सात लोकांना काळविण्याबाबत चिट्ठीत उल्लेख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *