मुंबईतल्या चेंबूर भागात भिंत कोसळली

पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री दीडच्या सुमारास घडली आहे. अशातच मुंबईतल्या चेंबूर भागातही भिंत कोसळली आहे. २ रिक्षांवर भिंत कोसळली आहे. या घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नाही. रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही भिंत कोसळली आहे. या ठिकाणी असलेला ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

या ठिकाणी असलेला ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. भायखळा भागातही भिंत कोसळून दुर्घटना घडली होती. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला. आता मुंबईतल्या चेंबूर भागातही भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *