मृत्यूनंतर भिकाऱ्याच्या झोळीत मिळाले ३.२२ लाख रुपये

अनंतपूर जिल्ह्यातील गुंटकल येथे मस्तानवली दर्ग्याच्याबाहेर पोलिसांना एका वृद्ध भिकारी व्यक्तीचा मृतदेह आढळला. या ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झोपेत झाल्याची माहिती तेथील लोकांनी पोलिसांना दिली. या वृद्ध भिकारी व्यक्तीची झोळीत पोलिसांना ३,२२,६७६ रुपये सापडले. स्थानिक या वृद्ध भिकारी व्यक्तीला बाशा या नावाने ओळखतात. बाशा मागील १२ वर्षापासून या दर्ग्याच्या बाहेर भिक्षा मागतो. बाशा मृत झाल्याची माहिती तेथील एका स्थानिकाने पोलिसांना दिली. या वृद्ध भिकारी व्यक्तीची झोळी तपासल्यावर त्यात त्याचे कोणतेही ओळखपत्र मिळाले नाही, मात्र त्याच्या झोळीत कित्येक वर्ष साठवलेल्या नोटा आणि चिल्लर मिळाल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित पोलिस निरीक्षक अनिल कपूर आणि पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण रेड्डी यांनी दिली.

स्थानिक लोक बाशाला चिल्लर एजंट म्हणून ओळखायचे. त्याचा जवळ अगदी पाचशे रुपयांचे सुट्टे ही सहज मिळायचे असे स्थानिक सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *