सौदी अरेबियात मशिदीमध्ये बॉम्बस्फोट, १३ ठार

सौदी अरेबियातील आभा शहरातील मशिदीमध्ये गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात १३ जण ठार झाल्याची माहिती  सौदीच्या अंतर्गत मंत्रालयाने दिली आहे.

सौदीचे विशेष कमांडो पथक या मशिदीचा वापर करत होते. मशिदीमध्ये प्रार्थना सुरु असताना हा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात सुरक्षा दलाशी संबंधित जवान ठार झाले.

सौदी वृत्तमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात ठार झालेले सुरक्षा पथकातील सदस्य होते. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *