जमिनीच्या वादातून शेतात थेट सैन्य घुसवण्याचा प्रकार भारतीय लष्कराच्या एका कर्नलने केला आहे. हा प्रकार करणाऱ्या कर्नल केदार गायकवाड यांच्यासह ३० ते ४० आर्मी जवानांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पु्णे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या शेत जमिनीचा हा वाद आहे.
गायकवाड कुटुंबीयांची जमीन भरणे आणि गाडे कुटुंबीयांनी अवैध मार्गाने बळकावल्याचा कर्नल गायकवाड यांचा आरोप आहे. २३ जूनला कर्नल गायकवाड यांचं तक्रारदार मोनिका गाडे यांच्याशी जमिनीवरून भांडण झालं. त्यावरून कर्नल गाडे ३० ते ४० जवानांसह आर्मीच्या गाड्या घेऊन गावात दाखल झाले. जवान आणि कर्नल शेतात घुसले, त्यांनी सोयाबीनचं पीक उध्वस्त केले.
रायफली घेऊन जवान गावात आणि शेतात घुसल्याचं पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलंय. पोलिसांनी कर्नल गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. या जमिनीच्या वादावरून यापूर्वीही एकमेकांवरती राजगुरूनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.
