सोने येत्या सहा ते १२ महिन्यांत २० हजारांवर!

सोने येत्या सहा ते १२ महिन्यांत २० हजारांवर!

दरवर्षी भारतात सरासरी ९०० ते १ हजार टन सोन्याची आयात केली जाते. सोन्याची आयात कमी करण्यासाठी गोल्ड मोनेटायझेशन योजना लागू करण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार आहे. सुवर्ण ठेव योजनेमध्ये ठेवीदाराला सोने परत करणे समाविष्ट राहील, तर गोल्ड मोनेटायझेशन स्कीमखाली दिलेले सोने भारतीय रुपयांमध्ये वठवता येऊ शकेल. यावेळी दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या, बाराव्या भारतीय आंतरराष्ट्रीय सुवर्ण संमेलनाची घोषणा करण्यात आली. १२ वे भारतीय आंतरराष्ट्रीय सुवर्ण संमेलन २१ आणि २३ ऑगस्ट, २०१५ रोजी ग्रँड हयात, गोवा इथे भरणार आहे. या परिषदेत भारत आणि २० अन्य देशांतील २०० हून अधिक कंपन्यांचे ५३० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

सोने येत्या सहा ते १२ महिन्यांत २० हजार रुपयांपर्यंत खाली येऊ शकेल, असे बुलियन बुलेटिन संशोधन अहवालात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *