फेसबुकवर दिवसाला तीन लाख रूपये जिंकण्याची संधी

फेसबुकवर दिवसाला तीन लाख रूपये जिंकण्याची संधी आता भारतातल्या युजर्सनाही मिळणार आहे. फेसबुकने कॉन्फेटी हा इंटरॅक्टीव्ह गेम भारतात आणण्याचे ठरवले आहे. काल हा खेळ प्रदर्षित झाला. बुधवार ते रविवार फेसबुकच्या व्हीडिओ प्लॅटफॉर्मवर हा खेळ लाईव्ह खेळला जाईल. यात स्पर्धकांना विविध प्रश्न विचारले जातील. त्यातल्या विजेत्यांना ३ लाखांचं बक्षिस जिंकण्याची संधी असेल.

फेसबुकने भारतीयांसाठी हा खास गेम शो आणला आहे. बुधवारपासून तो सुरु झाला आहे. तो भारतात ऑफिशियल शो आहे. आम्ही  युजर्सला नवीन देण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यामुळे या माध्यमातून ग्राहकाला एक प्रकारे जोडण्यासाठी हा प्रयत्न आहे. फेसबुकवर वेगळ्या आणि इंटरॅक्टिव्ह व्हिडिओचा अनुभव देण्यासाठी हा प्रयत्न असेल, असे फेसबुकचे अधिकारी मनीष चोपडा यांनी मुंबईत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *