आयडीबीआय बँकेने घटवले कर्जाचे व्याजदर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात पाव टक्का कपात केल्यानंतर आयडीबीआय बँकेने आपल्या कर्जांवरील व्याजदरात पाच ते १० अंकांनी (.०५ ते .१ टक्के) घटवले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या व्याजदराच्या धोरणाशी सुसंगती राखण्यासाठी या बँकेने आपल्या एमसीएलआरमध्ये (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेण्डिंग रेट) ही कपात केली असून ती तातडीने लागू करण्यात आली.

या बँकेच्या एक वर्ष मुदतीच्या एमसीएलआरचा दर आता ८.९५ टक्के झाला आहे. एक वर्ष कालावधीसाठीचा एमसीएलआर हा वैयक्तिक, वाहन आणि गृहकर्जांवरील व्याजदरांसाठी आधारभूत मानला जातो. एक दिवस, एक महिना व सहा महिने मुदतीच्या कर्जांचे व्याजदर अनुक्रमे ७.९, ८.१५ व ८.६ टक्के झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *