गुजरातला ‘वायू’ वादळाचा थेट धोका टळला मात्र परिणाम जाणवणार

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी हवेच्या दाबामुळे वायू चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनाऱ्यावरील शहरांना बसणार आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्रापासून जलदगतीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. ‘वायू’ चक्रीवादळाची दिशा बदलल्याने आता गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्याला समांतर अंतराने प्रवास सुरू ठेवला आहे. त्यामुळे ‘वायू’ चक्रीवादळ थेट गुजरातला धडकणार नसलं तरी त्याचा परिणाम समुद्र किनाऱ्यालगतच्या परिसरांना बसणार आहे. गुजरात प्रशासनाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना केल्या आहेत. आत्तापर्यंत 3 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. मुंबईत वातावरण ढगाळ आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्राचा धोका टळला आहे तरीही लोकांनी सावधानता बाळगणं गरजेचे आहे. वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पुढील 2 दिवस समुद्रकिनाऱ्यांवर लोकांना जाण्यासाठी बंदी घातली आहे. 12 आणि 13 जून रोजी राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील बीचवर जाण्यास लोकांना मनाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *