पश्चिम बंगालमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, दोन ठार

पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात गावठी बॉम्बचा स्फोट झाला असून या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. अज्ञात व्यक्तींनी वस्तीवर गावठी बॉम्ब फेकल्याचा दावा स्थानिकांनी केला असून परिसरात रात्री चोरीची घटना देखील घडली आहे.

नॉर्थ २४ परगना येथे सोमवारी रात्री कंकिनारा येथे अज्ञात व्यक्तींनी वस्तीत गावठी बॉम्ब फेकले. यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. “आम्ही खूप घाबरलो आहोत. गावठी बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर परिसरात चोरीची घटनाही घडली आहे. प्रशासनाने आम्हाला संरक्षण द्यावे”, असे स्थानिकांनी म्हटले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. तृणमूल काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते भिडल्याने वातावरण तापले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *