नागपुरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

नागपुरात सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातलाय. दिवसाढवळ्या गजबजलेल्या भागात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावतानाची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. वर्ध्यातील हिंगणघाटमधून नागपूरला कामानिमित्त आलेल्या ज्योत्स्ना भगत यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावलं. अत्यंत वर्दळीच्या आणि वाहतूक पोलीस तैनात असलेल्या गणेशपेठमधील मध्यवर्ती बसस्थानकासमोर तीनही चोर एकाच वाहनावरून आले आणि सगळ्यांसमोर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.

या घटनेनंतर पोलिसांनी दोन चोरांना अटक केली असून तिसरा चोर फरार आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे पाहायला मिळत आहे. उपराजधानीत चोरट्यांना कायद्याचा धाक नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे सध्या नागपूर पोलिसांचे गुन्हेगारांवर वचक बसवून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठीची विशेष मोहीम ‘ऑपरेशन ऑल आउट’ सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *