गाडीत गुदमरून १२ वर्षीय बालकाचा मृत्यू

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील देवरीफाटा जवळच्या आलेवाडी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका उभ्यागाडीत गुदमरुन १२ वर्षीय बालकाचा गुदमरून मृत्यू झाला आहे.  तानेश विष्णु बल्लाळ असे मृत बालकाचा नाव आहे. मृत्यू झालेला बालक हा कचऱ्यातून प्लास्टिक वेचण्याचा काम करीत होता.

तो आपल्या आजी आणि मावशीसोबत आलेवाडीत कचरा वेचण्यासाठी आला होता. गाडी मालकाच्या म्हण्यानुसार त्याची लाल रंगाची ओपेरा चारचाकी गाडी ही गेल्या दीड दोन महिन्यापासून बंद अवस्थेत उभी आहे.

मृत बालक हा गाडीत बसला आणि गाडीचे दरवाजे आतमधून बंद झाले. यात बालकांचा गूदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

दुपारी खूप ऊन असल्याने या गाडीत तो बसण्याकरीता गेला असल्याचा तर्क काढण्यात येत आहे. या घटनेची चौकशी आणि पुढील तपास दहीहंडा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *