झारखंड: माओवाद्यांच्या हल्ल्यात ११ जवान जखमी

झारखंडमधील सराकेलाच्या कुचाई भागात माओवाद्यांनी केलेल्या एलईडी स्फोटात ११ जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे उपचारासाठी रांचीतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमी जवानांमध्ये ३ झारखंड पोलीस आणि ८ ‘२०९ कोब्रा’ जवानांचा समावेश आहे.मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी याच ठिकाणी माओवाद्यांनी हल्ला केला होता.

आज पहाटे ४:५३ वाजता झारखंडमधील सरैकेला येखील कुचाई भागात हा स्फोट घडवण्यात आला. २०९ कोब्रा जवान आणि झारखंड पोलीस विशेष संयुक्त कारवाई दरम्यान हा हल्ला करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *