जोगेश्वरीत सिलेंडरचा स्फोट ; जखमींची संख्या १३ वर

जोगेश्वरी येथे सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यामध्ये १३ जण भाजले गेल्याचे वृत्त आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजले नाही.

मिळालेल्या महितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथील हनुमान चाळ येथे सिलेंडर स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये १० जण जखमी झाले होते. त्यानंतर आणखी ३ जणांना  उपचारासाठी जवळील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची एकूण संख्या १३ वर पोहोचली आहे.

स्फोटाची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल  झाले. आगीवर नियंत्रण मिळवले असून  सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *