बर्गरमध्ये काचेचे तुकडे; रिक्षाचालक ICU

पुण्यातील गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन कॉलेज रस्ता) ‘बर्गर किंग’च्या आउलेटमधील बर्गरमध्ये काचेचे तुकडे निघाल्याचे समोर आले आहे. हा बर्गर खाल्ल्याने एका रिक्षाचालकाला थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागल्याचा प्रकार १५ मे रोजी घडला. याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात बर्गर किंग डेक्कन एरियापुण्यातील गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन कॉलेज रस्ता) ‘बर्गर किंग’च्या आउलेटमधील बर्गरमध्ये काचेचे तुकडे निघाल्याचे समोर आले आहे. हा बर्गर खाल्ल्याने एका रिक्षाचालकाला थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागल्याचा प्रकार १५ मे रोजी घडला. याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात बर्गर किंग डेक्कन एरिया मॅनेजर, स्टोअर मॅनेजर आणि सुपरवायझर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साजित अजमुद्दीन पठाण (वय ३१, रा. वडारवाडी) हे मित्रांबरोबर ‘बर्गर किंग’मध्ये बर्गर खात होते. त्या वेळी अचानक त्यांना खोकला येऊन त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यानंतर मित्रांनी पाहिले असता, बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळले. काचेचे तुकडे खाल्ल्यामुळे पठाण यांना तोंडात व पोटाच्या अंतर्भागात जखम झाली आहे. मित्रांनी पठाण यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पठाण यांच्या घरी कोणी नसल्यामुळे त्यांनी उपचार घेतल्यानंतर १९ मे रोजी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी संबंधित आरोपींवर गुन्हा नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *