राज्यातील तापमान वाढणार

राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात १९ मेपासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे २५ मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील.

अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४७ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचेल. उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान ४२ अंशांच्या आसपास राहील, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. १८ ते २१ मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून बचावासाठी विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *