दफन करण्यापूर्वी जिवंत झाली चिमुरडी

मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्हा रुग्णालयात ज्या मुलीला जन्मानंतर मृत घोषित केले होते. त्याच मुलीला दफन करण्यापूर्वी तिच्या शरीरात हालचाल झाली आणि ती जिवंत असल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर त्या नवजात चिमुरडीला पुन्हा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

शिवपुरी जिल्हा रुग्णालयात रविवारी गधाई गावात कल्पना नावाच्या तरुणीला तिचे कुटुंबिय डिलेवरीसाठी दाखल केले. डिलेवरीनंतर नवजात मुलीला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. या चिमुरडीची प्रकृती खालावत असल्याने डॉक्टरांच्या देखरेखीखाली ही मुलगी होती. सोमवारी सकाळी या मुलीला मृत घोषीत करण्यात आले.

मुलीला कुटुंबियाकडे सोपविण्यात आले. त्यानंतर त्या मुलीला दफन करण्यासाठी नेण्यात आले. दफन करण्यापूर्वी या मुलीच्या शरिरात हालचाल झाली. सर्वांना धक्का बसला त्यांनी लगेच मुलीला रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणात मुलींच्या कुटुंबियांनी रुग्णालय आणि डॉक्टरांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तर रुग्णालयाने हे आरोप फेटाळले. सध्या या मुलीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *