जी.एस. लक्ष्मी पहिल्या महिला सामनाधिकारी

भारताच्या जी.एस. लक्ष्मी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पहिल्या महिला सामनाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सामनाधिकारी म्हणून त्या काम करू शकतात. क्लेअर पोलोसॅक यांनी पुरुषांच्या वनडे सामन्यात पंच म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून मान मिळविला होता. त्यानंतर लक्ष्मी यांनी ही झेप घेतली आहे. ५१ वर्षीय लक्ष्मी यांनी २००८-०९मध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये सामनाधिकारी म्हणून काम पाहिले होते. आता त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सामनाधिकारी म्हणून काम करता येणार आहे. त्यांनी या नव्या जबाबदारीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *