बेंगळुरू येथील वेल्लमा शहरानजीक झालेल्या कार अपघातात खामगाव येथील सात जण ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
२०१६मध्ये बुरहान वाणीचा एन्काउंटर करण्यात आला होता. बुरहान वाणीने सोशल मीडियाचा वापर करून नवीन कश्मीरच्या निर्मितीचा नारा दिला होता. तो काश्मीरमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. भविष्यात तो काश्मीरचे नेतृत्व करेल अशी कुजबुजही सुरू झाली होती. त्याच्या एन्काउंटर नंतर काश्मीरमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला होता. त्याच्या गावातील लोकांच्या मनात सरकारबद्दल आजही प्रचंड राग आहे. यामुळे या गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
तर दुसरीकडे पुलवामाचा मास्टरमाइंड अली अहमद दार याच्या गावातील केवळ १५ लोकांनी मतदान केलं आहे. दहशतवादाचा गड मानल्या जाणाऱ्या शोपियाँ जिल्ह्यातही अत्यल्प मतदान झालं आहे. तीन मतदान केंद्रावर दहशतवाद्यांनी हल्लाही केला आहे. यावर्षी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात लडाखमध्ये ६३ टक्के मतदान झालं होतं. तर घाटीतील बारामुल्ला येथे ३५ टक्के मतदान झालं आहे. यावेळी काश्मीरमधील मतदानाचा टक्का पहिल्यांदाच इतका घसरला आहे.
