सनीच्या ‘गदर-एक प्रेम कथा’ चा सिक्वेल येणार

‘हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा’ सारखे डायलॉग्स असो किंवा ‘मै निकला ओ गड्डी लेकर’ सारखी गाणी असो सनीचा ‘गदर-एक प्रेम कथा’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सनी देओल, अमिषा पटेल, अमरिश पूरी अशी स्टारकास्ट असणारा गदर-एक प्रेम कहाणी’ चित्रपट तुफान हिट झाला होता. त्यामुळे, आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची माहिती चित्रपटाच्या टीममधील एका सूत्रानं दिली आहे. सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, ‘आमची टीम गदरच्या सिक्वेलसाठी गेली १५ वर्ष काम करत आहे. या सिक्वेलमध्येही तारा(सनी दिओल), सकीना(अमिषा पटेल) आणि त्यांचा मुलगा जीत या तीन मुख्य पात्रांभोवतीच ही कथा फिरणार आहे. शिवाय, भारत – पाकिस्तान हा विषय कथेचं सूत्र असेल. या सिक्वेलमध्ये तेच कलाकार भूमिका साकारताना दिसतील. आम्ही सध्या सनीशी याविषयी बोलत आहोत. त्यामुळे, यापेक्षा अधिक कोणतीच माहिती याक्षणी आम्ही देऊ शकत नाही.’

तब्बल १८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रदर्शित झालेल्या ‘गदर-एक प्रेम कथा’ ने त्यावेळी २५६ कोटींचा गल्ला कमावला होता. त्यामुळे आता चित्रपटाचा सिक्वेल कसा असेल आणि बॉक्स ऑफिसवर काय जादू करेल हे पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *