फ्लोरिडात विमान नदीत कोसळले, प्रवासी सुखरूप

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये बोइंग ७३७ हे प्रवासी विमान लॅंडिंग करताना नदीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या विमानात १४० लोक होते. परंतु सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. बोइंग ७३७ हे विमान नवल एयर जॅक्शनविले येथील रनवे वरुन थेट सेंट जॉन्स नदीत कोसळले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. शेवटच्या भागात असलेल्या सेंट जॉन्स नदीत कोसळले. या विमानात १३३ प्रवासी आणि ७ क्रू कर्मचारी होते. विमान नदीतील खोल पाण्यात न कोसळल्यामुळे मोठा अपघात टळला असल्याची चर्चा आहे. स्थानिक यंत्रणांकडून मदत आणि बचाव कार्य त्वरीत सुरू करण्यात आले. जॅक्सनविले शहराचे महापौर आणि नगरपाल यांनी या अपघाताची माहिती ट्विटरद्वारे दिली. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती त्यांनी दिली.

अपघातग्रस्त विमान मायामी एअर इंटरनॅशनलचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कंपनीच्या ताफ्यात बोईंग ७३७-८०० ही विमाने आहेत. या अपघाताची माहिती मिळाली असून अधिक माहिती घेण्यात येत असल्याची प्रतिक्रिया बोईंगच्या प्रवक्त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *