लग्नाचं आमिष देऊन शरीरसंबंध ठेवणं बलात्काराच: कोर्ट

लग्नाचं खोटं आश्वासन देऊन महिलेसोबत शरीरसंबंध ठेवणं हा देखील बलात्कारच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

महिलेशी खोटं बोलून तिच्याशी शरीरसंबंध ठेवणं हे महिलेच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारं आणि तिच्या मनावर आघात करणं आहे, असं मत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एल.नागेश्वर राव आणि एमआर शाह यांच्या खंडपीठाने व्यक्त केलं. याशिवाय, सध्या पुढारलेल्या समाजात अशा घटना वाढत असल्याचंही खंडपीठाने नमूद केलं आहे.

छत्तीसगढमधील एका डॉक्टरविरोधात पीडीत महिलेने याचिका दाखल केली होती. पीडीत महिला आणि डॉक्टर एकमेकांना २००९ सालापासून ओळखत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. डॉक्टरने लग्नाचं आश्वासनही दिलं होतं. डॉक्टर आणि याचिकाकर्ती महिलेच्या प्रेमसंबंधाविषयी दोन्ही कुटुंबियांना पूर्ण कल्पना होती. आरोपी डॉक्टरने महिलेच्या कुटुंबियांसमोरच लग्नाचं आश्वासन दिलं होतं. पण त्यानंतर आरोपीने दुसऱ्याच महिलेसोबत लग्न केलं. पीडीत महिलेने डॉक्टरविरोधात कोर्टात धाव घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *