ताडदेव परिसरात ५० लाखाची रोकड जप्त

मुंबईतील ताडदेव सर्कल भागात निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ५० लाख रुपयांची संशयित रक्कम जप्त केली आहे. याबाबत ताडदेव पोलिस अधिक तपास करत आहेत.

मुंबईत ताडदेव सर्कल भागात शनिवारी रात्रीच्या सुमारास लाल रंगाच्या लँड रोव्हर (डिस्कवरी) या कारची तपासणी करण्यात आली. एम.एच.०१ सी.एच.०७०७ असा या कारचा नंबर आहे. निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाला या कारमध्ये तपासणीत ५० लाख रुपयांची रोकड आढळून आली. या कारमधील प्रशांत रमेशचंद्र समदानी यांच्याकडे ही रोकड आढळली.

आयकर विभागाला या प्रकरणी कळवण्यात आले आहे. आयकर विभागाचे उपायुक्त अधिक चौकशी करत आहेत, अशी माहिती मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *