कोणत्याही कार्यक्रमाला किंवा चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पोहोचायचं असेल तर ते ठरलेल्या वेळी पोहोचतातच. खिलाडी अक्षयकुमारही वेळेच्या बाबतीत असाच पक्का आहे. कुठलाही कार्यक्रम असेल किंवा शूटिंग, अक्षय दिलेल्या वेळेतच तिथे पोहोचतो. सध्या तो मुंबईमध्ये त्याच्या एका आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करतोय. चित्रीकरणासाठी तो सकाळी सहा वाजल्यापासून कामाला लागतो म्हणे. बरं, त्यात पाच मिनिटांचाही फरक होत नाही. त्यामुळे त्याच्या संपूर्ण टीमलाही सेटवर वेळेतच यावं लागत असल्याचं कळतंय.