राज (विद्यूत जामवाल) आणि त्याचा हत्ती ‘भोला’ या दोघांमधील अतूट नाते जंगली या सिनेमात चित्तारण्यात आले आहे. विद्यूत जामवालसोबत मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतही या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसते आहे. २९ मार्चला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.३५ कोटींची कमाई केली. त्यानंतर शनिवार, रविवारी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली. शनिवारी या सिनेमाने ४.४५ कोटींची तर रविवारी ६.०५ कोटींची कमाई केली.