काश्मीरमध्ये चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. चारही दहशतवादी हे लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून चौघांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

पुलवामा येथील लस्सीपूरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सोमवारी पहाटेपासून परिसरात शोधमोहीम सुरु होती. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांनी या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. चौघेही लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला असून दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलातील तीन जवानही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीही बडगाम येथे सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत जैश- ए- मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *