हार्दिक पटेलला न्यायालयाचा धक्का!

दि. १२ मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक यांनी जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. २०१५ मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनादरम्यान मेहसाणाच्या विसनगरमध्ये दंगल भडकली होती. या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर हार्दिक यांना जामीन मिळाला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये उच्च न्यायालयाने हार्दिकची शिक्षा निलंबित केली होती. मात्र, दोषी ठरवण्याच्या आदेशावर स्थगित आणण्यास नकार दिला होता.

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या इच्छेला गुजरात उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. पाटीदार आंदोलनाशी संबंधित एका प्रकरणात हार्दिक पटेल दोषी ठरल्याचा निर्णय रोखण्यास न्यायालयाने नकार दिला. गुजरातमध्ये २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल आहे. उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी हार्दिककडे खूप कमी कालावधी शिल्लक आहे. काँग्रेसलाही हा मोठा हादरा असल्याचे मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *