तेरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रकार कांदिवली पूर्व परिसरात घडला. या प्रकरणी सहा जणांवर कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे. तर चौघांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असून हे प्रकरण पुढील चौकशीसाठी समतानगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
कांदिवलीत दामू नगरच्या लहूगड परिसरात हा प्रकार घडला. यातील तक्रारदार मुलगी सुधा (नावात बदल) ही कुरारमध्ये राहते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च २०१९ ला रात्री ८च्या सुमारास सुधाच्या एका मैत्रिणीने तिला भेटायला बोलावले होते. त्यानुसार सुधा तिला भेटायला गेली. त्या वेळी डोंगरात फेरफटका मारून येऊ, असे तिने सुधाला सांगितले. सुधा तिच्यासोबत गेली. तेव्हा त्या ठिकाणी पाच जण आधीपासूनच हजर होते. त्यातील सलीम उर्फ बबलू (१९) आणि आणखी एका अल्पवयीन आरोपीला सुधा ओळखत होती. मात्र अन्य तीन जण तिच्या परिचयाचे नव्हते.
हा प्रकार समतानगरच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण आता त्यांना वर्ग करण्यात आले आहे. या घटनेमुळे दामू नगर परिसरात खळबळ उडाली असून मुलीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
