बालिकेच्या अमानुष छळ प्रकरण : आरोपी महिलेला १० वर्षे सश्रम कारावास

दहा महिन्याच्या बालिकेचा अमानुष छळ करणारया महिलेला, अलिबाग सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अफसाना नसीर शेख असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. खारघर येथील पुर्वा प्ले स्कूल नर्सरी मध्ये २१ नोव्हेंबर २०१६ रोजी ही घटना घडली होती.

नवी मुंबईतील खारघर येथे प्रियंका निकम आणि प्रवीण निकम यांचे पूर्वा प्ले स्कुल नर्सरी चालवत होते. या नर्सरी मध्ये अफसाना नसीर शेख हि बालकांना संभाळण्याचे काम करीत होती. नर्सरी मधील पिडीत बालिका झोपत नव्हती, त्यामुळे संतापलेल्या अफसाना शेख हिने त्या बालिकेला क्रुरपणे उचलून जमिनीवर आपटले. तसेच हाथाबुक्याने तीला मारहाण केली. पिडीत बालिका जिवाच्या आकांताने रडत असतांना तीच्या डोळ्यात तिखट मीठ आणि भाजी टाकले आणि तोंड दाबून मारहाण केली.

या घटनेनंतर पीडित बालिकेच्या आईने खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. खारघर पोलिसांनी तपास पूर्ण करून या प्रकरणी आरोपी विरोधात सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरच्या खटल्पाची सुनावणी अलिबागचे जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सो वाघवसे यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता म्हणून अँड अश्विनी बांदिवडेकर-पाटील काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यात पिडीत बालिकेची आई, वैद्यकीय अधिकारी डॉ. गवळी, गुन्ह्याचा तपास करणारे  अधिकारी पोलीस निरीक्षक सोनावणे यांची साक्ष महत्त्वाची ठरली

दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्या नंतर न्यायालयाने शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला, आणि आरोपी अफसाना नासीर शेख हिला भादवी कलम ३०७, आणि कलम ३२५अन्वये दोषी ठरविले. तीला दहा वर्षांची सक्त मजूरीची शिक्षा आणि दंडही ठोठावला. याच प्रकरणातील अन्य दोन आरोपींची न्यायालयाने पुराव्यांआभावी निर्दोष मुक्तता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *