मुंबई-पुणे महामार्गावरील एक मार्गिका उद्या दोन तासांसाठी बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कमान बसविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने या मार्गावरील मुंबईकडे येणारी एक मार्गिका उद्या गुरुवारी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. उद्या दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत ही वाहतूक बंद राहणार असल्याचं पोलीस अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितलं.

मुंबईकडे येणारी मार्गिका बंद राहणार असल्याने प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. खालापूर टोल- खालापूर गाव- खालापूर फाटा-मार्गे चौक फाटा- दौंड फाटा- शेडूंग टोल, अजिवळी फाटा आणि त्यानंतर परत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ही वाहतूक वळवण्यात आली आहे. म्हणजे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या ही वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहनही पाटील यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *