रंग खेळू न दिल्याने १४ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

रंग खेळू नको म्हटल्यामुळे एका १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जाधववाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे घडली. ही घटना सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास उघडकीस आली. यश दशरथ जाधव असे आत्महत्या केलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

यश हा आठवीत शिकत होता. यशचे वडील दशरथ हे ऑडिटरचे काम करतात. सोमवारी सुटी असल्याने ते शेतात लहान मुलगा ओम समवेत शेळ्या घेऊन चारण्यास गेले होते. यश हा घरी अभ्यास करत बसला होता. दरम्यान, पाचच्या सुमारास यशने घरी गळफास घेतल्याचे काका बाळू जाधव यांना दिसले. त्याला त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ऐन सणादिवशी मुलगा गेल्याने वडील दशरथ व लहान मुलगा ओम याने हंबरडा फोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *