पाठ्यपुस्तकात आसाराम संतांच्या यादीत!

पाठ्यपुस्तकात आसाराम संतांच्या यादीत!

राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यात तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील संतांवरील एका धड्यात बलात्काराचा आरोप असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम यांचा उल्लेख करण्यात आल्याचे समोर आले आहे. स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा, रामकृष्ण परमहंस, गुरुनानक, कबीर, मिराबाई यांच्याबरोबर आसाराम यांचेही छायाचित्र विद्यार्थ्यांना ओळखण्यास सांगितले आहे. संतांच्या यादीत योगगुरू रामदेव यांचाही समावेश आहे.

मूल्यशिक्षण आणि जीके विषयाचे ‘नया उजाला’ हे पाठ्यपुस्तक जिल्ह्यातील अनेक शाळांच्या अभ्यासक्रमात असून दिल्लीतील गुरुकुल एज्युकेशन बुक प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. याबाबत प्रकाशकांना विचारले असता, पुस्तक प्रकाशित करताना आसाराम यांच्याविरोधात खटला दाखल नव्हता, असे स्पष्टीकरण देण्यात आले. आम्ही बाजारातून ही पुस्तके परत घेत आहोत आणि पुस्तकाच्या नवीन आवृत्तीची तयारी करत आहोत, असे संस्थेच्या प्रतिनिधीने सांगितले. दरम्यान, ज्या शाळांमध्ये अभ्यासक्रमात ही पुस्तके आहेत, त्या शाळा प्रशासनाला नोटिसा पाठवल्या जाणार आहेत, असे शिक्षणविभागाने स्पष्ट केले. आसाराम सोळा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गेली दोन वर्षे जोधपूरच्या तुरुंगात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *