पाण्याच्या पिशव्या मारण्यावरून वाद

धुलिवंदन गुरुवारी असले तरी एकमेकांना पाण्याने भरलेल्या पिशव्या मारण्यावरून आतापासूनच वाद होऊ लागले आहेत. याच वादातून घोडबंदर रोडवरील डोंगरीपाडा येथे चौघांनी मिळून एका कुटुंबातील तिघांना मारहाण केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वामननगरमध्ये राहणाऱ्याा शैलेश राऊत यांच्या लहान भावाचा १५ वर्षांचा मुलगा आणि एक ११ वर्षांचा मुलगा यांच्यात घाण पाणी असलेल्या पिशव्या मारण्यावरून किरकोळ भांडण झाले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून संतप्त आरोपींनी त्यांच्या दुकानातील सामानाचे नुकसान केले. तसेच लोखंडी सळईने शैलेश यांना मारहाण केली. त्यांच्या मोठ्या भावाची मुलगी आणि लहान भावाच्या पत्नीलाही आरोपींनी मारहाण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *